ड्रायव्हर नसतानाही ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी.

आपल्या भारत देशात शेती करण्यासाठी यांत्रिकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु आता आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की ट्रॅक्टर चालवण्यासाठी सुद्धा माणसाची गरज नाही, तर तुम्हाला याचे आश्चर्य नक्कीच वाटेल.

अकोल्यात जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालक नसतानाही ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली आहे. महाराष्ट्रातला जर्मन तंत्रज्ञानाचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालक नसतानाही ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन व तुरीची पेरणी केली गेली आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होते. त्यामुळे हे तंत्रज्ञान सोईस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले.

कशी होते चालक नसतानाही शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी-

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ड्रायव्हरची गरज भासत नाही. अगदी सरळ रेषेत पेरणी होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे आर्थिक हे आर्टिके हे उपकरण शेतात एका बाजूला ठेवावे लागते व जीपीएस कनेक्टरद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते. हे उपकरण जर्मन बनावटीचे आहे. तसेच त्यासाठी शेतकऱ्यांना 4.5 ते 5 लाख रुपये इतका खर्च येतो.

राज्यातला पहिलाच प्रयोग-

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही ट्रॅक्टर चालवायला चालक हा लागत होता. परंतु आता मात्र तंत्रज्ञान या टप्प्याच्या पुढे गेले आहे. आता चालक नसताना सुद्धा ट्रॅक्टरच शेतात काम करू लागले आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात स्टेअरिंगचे आपोआप फिरणे हे कदाचित कोणती जादू वाटेल. परंतु हे शक्य झाले आहे ते फक्त ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजीमुळे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *