बाल संगोपन योजना सुरू; पहा शासन निर्णय

नमस्कार मित्रांनो,

   आज आपण बाल संगोपन योजनेविषयीची माहिती पाहणार आहोत. आज आपण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, योजनेची पात्रता, कोणत्या मुलांना दरमहा पैसे मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

   आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती. जर आपणास हा लेख आवडला तर आपल्या मित्र- मैत्रिणींना नक्की शेअर करा व त्याचबरोबर आपल्या परिसरात कोणी गरजू मुले असतील त्यांना किंवा त्यांनच्या पालकंना ही माहिती नक्की सांगा, जेणेकरून जे गरजू मुले असतील त्यांच्यापर्यंत या लेखातील माहिती पोहोचवण्यास मदत होईल. तसेच जी मुले पात्र असतील त्यांना याचा लाभ घेता येईल.

सदर योजनेची माहिती-

  • बालसंगोपन ही योजना सरकारी आहे. महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभाग यांच्या साह्याने ही योजना सुरू केली आहे.
  •  सन 2005 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि राज्यातील अनाथ तसेच गरीब मुलांना व बालकांना आर्थिक मदत आणि त्यांना कौटुंबिक आधार देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
  •  राज्यातील 50,000 हून अधिक बालकांना योजनेचा लाभ मिळत आहे.
  •  या योजनेसाठी 0 ते 18 वर्षाखालील मुले समाविष्ट आहेत.

सदर योजनेतंर्गत किती पैसे मिळतात-

  • या योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या लाभार्थी अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.
  • स्वयंसेवी संस्थेला या योजनेच्या माध्यमातून रु.250/- पर्यंत दरमहा सहायक अनुदान मिळते.
  • या योजनेतंर्गत बालकांना दरमहा रु.2,250/- आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • बाल संगोपन योजनेतंर्गत रोख स्वरूपात देण्यात येणाऱ्या लाभाचे स्वरूप बंद केले आहे. आता फक्त धनादेशाद्वारे त्यांच्या बँक खात्यात सदर रक्क जमा करण्यात येते.

सदर योजनेसाठीची पात्र मुले-

  • या योजनेसाठी 0 ते 18 वर्षांमधील बालके पात्र असतील.
  • कोविड कालावधीमध्ये एक किंवा दोन्हीही पालक गमावलेले बालके
  • ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी अनाथ बालके
  • अविवाहित, कुष्ठरोग, विभक्तीकरण, घटस्फोटीत, मातृत्व गंभीर आजार पालक अशी बालके
  • बहू विकलांग बालके, दोन्ही पालक आई वडील दिव्यांग अपंग अशी बालके, मतिमंद बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच आय व्ही नी ग्रस्त असलेलली बालके,
  • फेटाळणी व दुर्लक्ष न्यायालयीन किंवा पोलीस प्रकरणात अपवाद परिस्थितीतील बालके
  • शाळेत न जाणारे बालकामगार बालके,
  • तुरुंगात असलेले पालक एच आय व्ही किंवा कॅन्सर सारख्या दूरधर आजाराने ग्रासलेले पालक, कौटुंबिक

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जाच्या फाईल सोबत इतर कागदपत्रे जोडणे ही आवश्यक आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • पालकांचे व बालकांचे आधार कार्ड झेरॉक्स
  • मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
  • पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला
  • पालकांचा रहिवासी दाखला (ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा)
  • मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक
  • मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • घरासमोर पालकांसोबत बालकाचा फोटो. 4 बाय 6 फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकाचा स्वतंत्र फोटो)
  • मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
  • बालक मतिमंद दिव्यांग असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र
  • दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो
  • निकषानुसार इतर कागदपत्रे इत्यादी
  • नोट- अधिक माहितीसाठी बाल संगोपन योजनेच्या womenchild.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

 धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *