आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा देणार 5000 रुपये…

नमस्कार मित्रांनो,

   अटल पेन्शन योजनेतंर्गत मासिक, त्रैय मासिक आणि अर्धवार्षिक योगदान जमा करण्याची सुविधा मिळते. आज आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून पाहणार आहोत, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती. जे लोक लहान-मोठे व्यवसाय, मोलमजूरी, शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, त्या लोकांसाठी वृद्धपकाळातही उत्पन्न मिळावे या हेतूने सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली होती.

   30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणीही या पेन्शन योजनेतंर्गत स्वतःची नोंद करू शकत होते. परंतु 1 ऑक्टोबर पासून त्याचे नियम बदललेले आहेत. जे लोक आयकर स्लॅब मध्ये येत नाहीत, असेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती यामध्ये नोंदणी करू शकतात. तुम्हाला मिळणारी पेन्शनची रक्कम तुम्ही दिलेल्या योगदानावर अवलंबून असते. मासिक पेन्शनचा लाभ वयाच्या 60 वर्षानंतर लोकांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत मिळतो.

   जर आपणास आपले म्हातारपण सुरक्षित करायचे असेल तर आपण जाणून घेऊया कोणत्या वयात किती मासिक योगदान द्यावे लागेल. जेणेकरून वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये मिळू शकतील. जर तुम्ही मासिक योगदानाची निवड केली, तर तुम्हाला दर महिन्याला वयानुसार योगदान भरावे लागेल. जर त्रैय मासिक योगदानाची निवड केली, तर तीन महिन्यांनी योगदान भरावे लागेल. जर तुम्ही अर्धवार्षिक योगदानाची निवड केली, तर दर सहा महिन्यांनी योगदान भरावे लागेल.

   या योजनेसाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. कारण योजनेच्या योगदानाचे पैसे  तुमच्या बँक खात्यातूनच कापले जातात व तुम्हाला त्याच बँक खात्याद्वारे 60 वर्षानंतर पेन्शनही मिळते. जर तुमच्याकडे अगोदर पासूनच बँक खाते असेल तर ते तुम्ही अटल पेन्शन योजनेशी जोडू शकता.

    जर तुम्हाला 5000 रुपये वृद्ध काळात दरमहा पेन्शन मिळवायचे असेल, तर वयाच्या 18 व्या वर्षी खाते उघडल्यास तुम्हाला मासिक 210 रुपये, त्रैय मासिक 626 रुपये आणि अर्धवार्षिक 1239 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी योगदान सुरू केले, तर मासिक 228 रुपये, त्रैय मासिक 679 रुपये आणि अर्धवार्षिक 1346 रुपये भरावे लागतील.

   जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी योगदान सुरू केले, तर मासिक 248 रुपये, त्रैय मासिक 739 रुपये आणि अर्धवार्षिक 1464 रुपये भरावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बचत बँक खाते असणे गरजेचे आहे. जर आपणास ही माहिती आवडली तर आपल्या मित्र- मैत्रिणींना नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *