आज आम्ही महिला-भगिनींसाठी आनंदाची बातमी या लेखातून घेऊन आलेलो आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने LPG गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. परंतु LPG गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र शासनाने अजून कपात केली आहे. आता आपणास घरगुती गॅस सिलेंडर 600 रुपयात मिळणार आहे.
या लेखातून आपण कोणाकोणाला गॅस सिलेंडर 600 रुपयात मिळणार आहे, यासाठी कोणत्या महिला पात्र असतील हे आपण पाहणार आहोत. जर आपणास ही माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
सदर निर्णयासाठी लागणारी पात्रता–
पीएम उज्वला योजनेतंर्गत ज्या महिलांना गॅस मिळत आहे. त्यांना घरगुती गॅसच्या एका टाकी मागे २०० रुपये एवढी सबसिडी मिळत आहे. परंतु सध्या स्थितीला केंद्र शासनाच्या निर्णयानुसार पीएम उज्वला योजनेतंर्गत ज्या महिलांना घरगुती गॅसच्या एका टाकी मागे 300 रुपये एवढी सबसिडी मिळणार आहे. म्हणजेच पीएम उज्वला योजनेतंर्गत ज्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार आहे तो त्यांना 600 रुपयात मिळणार आहे.
सदर सबसिडीचे विवरण-
पीएम उज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या भगिनींना गॅस सिलेंडर खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरायची आहे व त्यानंतर 200 रुपये सबसिडी ऐवजी 300 रुपये सबसिडी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
धन्यवाद !