मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली गेली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णयासह दिवाळीला देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शिधा वाटपाची जबाबदारी ही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दिवाळी साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्या येणार आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. हा शिधा 100 रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. यावर्षी देण्यात येणाऱ्या शिधामध्ये अधिकच्या 2 वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
आनंदाचा शिधा या संचात देण्यात येणाऱ्या वस्तू-
- साखर- 1 किलो
- रवा- 1 किलो
- चणाडाळ- 1 किलो
- मैदा- 1 किलो
- पोहे- 1 किलो
- खाद्य तेल- 1 लिटर
आनंदाचा शिधा वितरित करण्याची तारीख-
हा शिधा 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यात वाटप करण्यात येईल.
नोट-जर आपणास वरील माहिती आवडली असेल, तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद !
WhatsApp Group
Join Now