कडबा कुटी मशीन अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो,

   आज आपण या लेखातून कडबा कुट्टी मशीन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात गाई, मेंढ्या, शेळ्या, म्हशी व इतर पाळीव प्राणी असतात. शेतकरी जोडधंदा म्हणून किंवा शेतीसाठी शेणखत, दूध मिळवण्यासाठी त्यांचा संभाळ करत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी असतील त्यांना त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.

   चारा कापून घालताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तो त्यांना हाताने कापून बारीक बारीक तुकडे करून गुरांसमोर टाकावा लागतो. त्यामध्ये बराचसा वेळही जातो व त्याच बरोबेर तो चारा देखील गुरांना व्यवस्थित खाता येत नाही. त्यामुळे चारा खूप वाया जातो. या सर्व अडचणींचा विचार करून सरकारने कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान देण्याचे ठरवले आहे.

   जनावरांचा खाण्याचा चारा या मशीनच्या साह्याने पटकन व नासधूस न होता कापता येतो, त्याच बरोबर मशींच्या मदतीने चाऱ्याची कापणी केल्यामुळे तो बारीक होतो व जनावरांना तो चावायलाही सोपा जातो.

सदर मशीनची किंमत

 या मशीनची किंमत 10 हजारापासून ते 40 हजारापर्यंत आहे. कडबा कुटी मशीनची किंमत 3 HP, 4HP याप्रमाणे ठरवली जाते. कडबा कुटी मशीनचे ही दोन प्रकार आहेत. 1) मानवचलित कडबा कुटी मशीन, 2) स्वयंचलित कडबा कुटी मशीन. स्वयंचलित कडबा कुट्टी मशीन ही थोडी महाग आहे.

सदर योजनेचे अनुदान

या मशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते. म्ह्णजेच रु.20,000/- ऐवढे अनुदान दिले जाते, तर दुसर्या शेतकऱ्यांनसाठी ही अनुदान मर्यादा रु. 16,000/- ऐवढी आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधारकार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जमिनीचा 7/12 व 8अ उतारा

सदर मशीनसाठी अर्ज कसा करावा-

जर शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्येमातून अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी Online Application Form भरावा लागतो. शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर निवड केली जाते. नंतर आवश्यक ती कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी. ती पडताळणीसाठी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडे जातात व नंतर त्या शेतकऱ्यला कडबा कुटी मशीन अनुदान दिले जाते.

  • नोट- सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. जर आपणास ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र- मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *