गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन बद्दल.

आज आपण सदर लेखातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत झालेल्या नवीन बदला बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या योजनेची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर याचा राज्यातील महिला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सदर योजनेत झालेला बदल-

  • राज्यातील महिलांसाठी आपल्या शासनाने आत्तापर्यंत शेकडो योजना सुरू केलेले आहेत. त्यातीलच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना महिला शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. महिलांसाठी या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.
  • नवीन बदलानुसार आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीचा जर बाळांतपणात मृत्यू झाला तर या महिला शेतकऱ्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • या अगोदर या योजनेच्या माध्यमातून जर शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर या मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती.
  • मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आलेली असून, महिला शेतकऱ्याचा जर बाळंतपणात मृत्यू झाला तर त्या मयत महिलेच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा लागतो.

सदर योजनेचा अर्ज कोठे करावा?-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात घडल्याच्या 30 दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा लागतो.
  • प्रस्ताव सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना द्यावी लागतात.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात याचा सविस्तर असा प्रस्ताव सादर करावा लागतो.
  • प्रस्ताव सादर केल्यानंतर अपघात घडलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना मदत दिली जाते.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • 7/12 उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • निवडणूक मतदान कार्ड
  • एफआयआर
  • स्थळ पंचनामा
  • पोलीस पाटील माहिती अहवाल

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *