कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो.

पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास या उद्योगामुळे मदत होणार आहे व नफा देखील मिळणार आहे.  

कांद्यावर प्रक्रिया कशी केली जाते?-

डीहायड्रेशन: या प्रक्रियेमध्ये कांद्याचे बारीक काप केले जातात. डीहायड्रेशन मशीन किंवा उन्हामध्ये कांद्याचे काप वाळवले जातात. त्यानंतर कांद्याच्या या वाळवलेल्या तुकड्यांना बारीक केले जाते व त्याची पावडर तयार करून बाजारात जास्तीत जास्त किमतीत विकली जाते.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला 1 लाख 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत भांडवल लागू शकते. कांदा हा कच्चा माल असून ज्या ठिकाणी कांद्याची जास्त प्रमाणात लागवड होते तेथून किंवा जी कांदा खरेदी विक्री केंद्र जवळ आहेत, अशा ठिकाणी वाहतूक खर्च कमी व्हावा या उद्देशाने हा प्रक्रिया उद्योग उभारणे फायद्याचे ठरते.

लागणारी यंत्र सामग्री-

जर आपणास हा उद्योग छोट्या स्वरूपात सुरू करायचा असेल तर आपणास कांद्याचे तुकडे करण्यासाठी कटिंग मशीनची आवश्यकता भासणार आहे. तसेच कांद्याचे काप वाळवण्यासाठी ड्रायर व वाळवलेल्या तुकड्यांपासून पावडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीनची आवश्यकता लागणार आहे. या प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा माल पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग मशीन देखील लागते.

जर आपण या प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर केला तर उत्पादन क्षमता जास्त वाढते. जर तुम्हाला सोलर ड्रायर घ्यायचा असेल तर 65000 च्या पुढे खर्च येऊ शकतो. ग्राइंडर मशीन हे 8000 व पॅकेजिंग मशीन 1500 रुपये इतका खर्च येऊ शकतो. तुम्ही हा उद्योग दोन किंवा पाच व्यक्तींच्या मनुष्यबळापासून देखील चालू करू शकता.

कोठे करावी मालाची विक्री-

कांदा प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा माल हा मॉल, मसाले तयार करणाऱ्या कंपन्या व तुमच्या शहरांमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये देखील पुरवू शकता. कारण या उत्पादनाची आता मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्याचबरोबर ज्या कंपन्या वेफर्स तयार करतात ते देखील कांदा पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात अशा कंपन्यांसोबत देखील तुम्ही टाईअप करू शकता व तुमचा व्यवसाय वाढू शकतात.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *