आज आपण सदर लेखातून गॅस धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या वतीने कोणत्याही गॅस धारकांसाठी म्हणजेच एचपी गॅस, इंडियन गॅस किंवा भारत गॅस धारक असाल तर आपल्या गॅसची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ई-केवायसी कशी करावी?
ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे?-
ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे कारण आपण हयात आहात की नाही किंवा आपल्या गॅस कनेक्शन वरती इतर कोणी गॅस तर घेत नाही ना किंवा अधिक अनाधिकृत कामकाजाला आळा घालण्यासाठी शासनाकडून ई-केवायचे करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- गॅस पुस्तक
- स्वतः व्यक्ती
ई-केवाईसी करण्याचे प्रकार-
- ई-केवायसी बायोमेट्रिकद्वारे करत येते किंवा
- फेस कॅमेरा द्वारे देखील करता येते.
- ई-केवायसी करण्यासाठी गॅस धारक स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कोठे जाऊन करावी –
ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे किंवा मिनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपणास ई-केवायसी करू शकता.
महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण ई-केवायसी करू शकता का?-
महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपणास ई-केवायसी करता येणार नाही. आपण ई-केवायसी फक्त आपल्या जवळील गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा मिनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपणास ई-केवायसी करू शकतो.
ई-केवायसी कधीपर्यंत करता येईल?-
ई-केवायसी 31 मे 2024 पूर्वी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर ई-केवायसी करता येणार नाही. जर ई-केवायसी केली नाही तर जे अनुदान 300 रुपये प्रमाणे मिळते ते देखील मिळणार नाही. त्यासाठी सर्व गॅस धारकांना शासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत की सदर ई-केवायसी 31 मे पूर्वी पूर्ण करून आपण अनुदान योजनेचा लाभ घ्यावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.