या कोंबडीचे एक अंडे 100 रुपयांला विकले जाते. चला तर मग जाणून घेऊयात की कोणत्या जातीची ती कोंबडी आहे.

आज आपण सदर लेखातून अशा कोंबडी बद्दलची माहिती पाहणार आहोत, की जिचे एक अंडे 100 रुपयांना विकले जाते. ही कोंबडी पाळणे अगदी सहज आहे. कोणीही या कोंबड्या अगदी सहज पाळू शकतात. या कोंबड्यांला पाळण्यासाठी खूप खर्च देखील लागत नाही. या कोंबड्यांना आपण सामान्य कोंबड्यांप्रमाणेच पाळू शकतात.

सदर कोंबड्यांची माहिती-

या कोंबडीचे नाव असील असे आहे. या कोंबडीचे तोंड लांब आणि लाटण्याच्या आकाराचे असते. तिला भरपूर पंख, घनदाट डोळे व लांब मान असते. ही कोंबडी अत्यंत दुर्मिळ आहे.

या कोंबडी समोर कडकनाथ कोंबडी ही फेल आहे. ही कोंबडी इतर कोंबड्यांसारखे रोज अंडे देत नाही. ही कोंबडी वर्षातून फक्त 60 ते 70 अंडे देते. परंतु या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 100 रुपये आहे.

या कोंबडीचे अंडे डोळ्यांसाठी अतिशय चांगले असते. या जातीच्या कोंबड्या ह्या 3 ते 4 किलोच्या असतात व कोंबडे हे 4 ते 5 किलोचे असतात. या कोंबड्या ह्या दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान व आंध्र प्रदेश या ठिकाणी आढळून येतात.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *