घरी बसल्या तुमच्या मोबाईल वरून फक्त 2 मिनिटात डाऊनलोड करा कलरफुल मतदान कार्ड.

आपल्या भारत देशात हा लोकशाही प्रधान देश आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी लोकांसाठी लोकच राज्य चालवत असतात त्याला लोकशाही असे म्हटले जाते. या लोकशाही पद्धतीत दर 5 वर्षांनी मतदान येते. मतदान करण्याचा हक्क हा भारतातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला आहे. फक्त त्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे.

मतदान कार्ड हे प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र आहे. चला तर मग आपण सदरलेखातून कलरफुल मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. परंतु हे मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही मतदार रजिस्ट्रेशन केलेले असणे गरजेचे आहे.

मतदान कार्डची थोडक्यात माहिती-

मतदान कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकाला भारत निर्वाचन आयोगकडून दिले जाते. या मतदान कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून देखील नागरिक करू शकतात. मतदान कार्डमध्ये त्या नागरिकाचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक असतो.

आता कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जायची गरज भासत नाही कारण निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा सुरू केली आहे की आपण ऑनलाईन घरी बसल्या निशुल्क तेही एका क्लिकवर मतदान कार्ड आपणास डाऊनलोड करता येऊ शकते.

मतदान कार्ड डाऊनलोड कसे करावे?-

  • सर्वात अगोदर आपणास भारतीय निवडणूक आयोगाच्या  voters.eci.gov.in या अधिकृत  संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर सर्वात अगोदर Sign Up या पर्यायावर क्लिक करावे लागेल व तेथे स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकावा लागेल.
  • वेबसाईटची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर दिलेल्या लॉगिन बटनवर क्लिक नोंदनी करताना वापरलेला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • त्यानंतर तुम्हाला e-EPIC Download या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता e-EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक या दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय Select करा.
  • तुमच्याकडे असणाऱ्या कोणताही एक क्रमांक टाकून आपले राज्य निवडा व SEARCH बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर थोड्या सेकंदामध्ये जो मोबाईल नंबर मतदान ओळखपत्रात लिंक केला आहे किंवा जो ई-मेल आयडी टाकलेला आहे त्यावर OTP पाठवला जाईल. आता तो OTP पडताळणी करा व समोरील रकान्यात भरा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर वोटर कार्ड दिसेल. आता डाऊनलोड बटणावर क्लिक करा व कलर वॉटर कार्ड डाऊनलोड करून घ्या.
  • हे डाऊनलोड केलेले e-EPIC मतदान कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *