आज आपण सदर लेखातून माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून पालकांना पहिल्या मुलीसाठी 50 हजार रुपये व दुसऱ्या मुलीसाठी 25 हजार रुपये एवढे रक्कम दिली जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे मुलींचे जीवनस्तर उंचावण्यासाठी राबवली जाते.
सदर योजनेची पात्रता-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- ज्या व्यक्तीला एक किंवा दोन मुली असतील तर असा व्यक्ती या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला तीन अपत्य असतील तर तो व्यक्ती या योजनेचा अर्ज करू शकत नाही.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म हा 1 ऑगस्ट 2021 नंतर झालेला असावा. त्याअगोदर जन्माला आलेल्या मुली या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
सदर योजनेच्या लाभाचे स्वरुप-
- या योजनेच्या माध्यमातून एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये मिळणार आहेत
- दोन मुली असतील तर 25-25 हजार रुपये मिळणार आहे
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मुलीच्या आईचे किंवा मुलीचे बँक पासबुक
या योजनेचा अर्ज करताना तुम्हाला फॉर्म सोबत हे सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. इतर कागदपत्रे ही अर्ज करताना लागू शकतात. त्यामुळे सगळे कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा. जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-
- या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्वात अगोदर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा Application Form Download करायचा आहे. त्यासाठी तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. तेथे या योजनेचा GR दिलेला आहे व शेवटी दिलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तुमच्या जवळील महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्यावी. तेथील अधिकाऱ्यांकडे या योजनेचा फॉर्म व सर्व कागदपत्रे सादर करावीत.
- अधिकारी तुमचा फॉर्म Verify करतील. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
नोट–
- तुम्ही या योजनेसाठी अंगणवाडी कार्यालयात जाऊन देखील अर्ज करू शकता. अंगणवाडी सेविका किंवा कर्मचारी यांच्यामार्फत हा फॉर्म Verify केला जातो.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now