PM उज्वला योजना 2.0 महाराष्ट्र माहिती. लगेच अर्ज करून लाभ घ्या.

आज आपण सदर लेखातून PM उज्वला योजना 2.0 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत देशातील पात्र महिलांसाठी राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला मोफत फ्री मध्ये गॅस कनेक्शन दिले जाते. जर तुमच्याकडे घरगुती गॅस कनेक्शन नसेल तर तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा.

तसेच लवकरात लवकर अर्ज करून मोफत गॅस कनेक्शन घ्यावे. या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करू शकता. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराने फॉर्म भरणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे.
  • ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, अशा महिलेच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे घरगुती LPG गॅस कनेक्शन नसावे.
  • या योजनेसाठी SC, ST, प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) लाभार्थी, MBC, अंत्योदय शिधापत्रिका धारक मागासवर्गीय, गरीब महिला अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक इत्यादी
  • त्याचबरोबर इतर काही कागदपत्रे द्यावी लाग्णार आहेत.

सदर योजनेचा ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कसा करावा-

  • अर्ज करण्यासाठी स्थानिक Distributor कडे जाऊन त्याने सांगितलेली सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी लागतील.
  • जर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत असाल तर सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करावी लागणार आहेत.

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर तुम्हाला PM Ujjwala Apply Online या लिंक वरती जावे लागेल.
  •  अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Click Here to apply for new Ujjwala 2.0 Connection या Option वर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या समोर एक Pop up यईल. त्यात तीन गॅसचे ऑप्शन येतील. त्यातून तुम्हाला जो गॅस पाहिजे आहे त्याची निवड करायची आहे.
  • Click here to apply येथे क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट Open होईल. तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे.
  • नोंदणी केल्यानंतर PM Ujjwala Yojana 2.0 Application Form Open होईल तो  तुम्ही लक्ष देऊन भरायचा आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सांगितलेली सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायची आहेत.
  • सर्वात शेवटी एकदा अर्ज  परत Verify करून घ्यायचा आहे व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

तुम्ही सादर केलेला अर्ज हा अधिकाऱ्याद्वारे तपासला जाईल. फॉर्म Approved झाल्यानंतर तुम्हाला पीएम उज्वला योजना 2.0 च्या माध्यमातून मोफत LPG Gas Connection दिले जाते व तसेच तुम्ही गॅस सबसिडीसाठी देखील पात्र होता.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *