गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अशी चेक करा.

आपण नेहमीच गॅस संपायचा अगोदरच नवीन सिलेंडरची ऑर्डर देत असतो. आपल्याला कितीही घाई गडबड असली तरी आपण सिलेंडर कुठे लिक आहे की नाही याची खात्री करून घेत असतो. त्याचे वजन देखील तपासले जाते. परंतु सिलेंडरची एक्सपायरी डेट आपण तपसत नाही. परंतु हे धोक्याचे आहे आपण तारीख तपासूनच सिलेंडर घेणे गरजेचे आहे.

आपण नेहमी बाजारातून एखादी वस्तू विकत घेत असतो, ती वस्तू विकत घेतल्यानंतर आपण त्याची एक्सपायरी डेट चेक करत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही जागरूकता खूप गरजेची देखील आहे. बाजारात अनेक गोष्टी एक्सपायरी डेट नंतर सुद्धा विकल्या जातात. त्यामुळे आपण त्यावर फारसे लक्ष देत नाही. यापैकीच एक वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर याचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी संपर्क येत असतो. घरगुती गॅस सिलेंडरवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. हे बहुतेक लोकांना माहितीच नाही. चला तर मग जाणून घेऊया.

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी चेक करावी-

  • अक्षरे ही सिलेंडरच्या मुदतबाह्य होणारा महिना दर्शवतात व सिलेंडर वरील अंक हे कोणत्या वर्षी मुदतबाह्य होणार आहे हे दर्शवतात.
  • 12 महिन्यांची विभागणी ही चार गटांमध्ये केली जाते. त्यांना अनुक्रमे A, B, C, D, अशी नावे दिली जातात.
  • सिलेंडरवरती तीन पट्या असतात. त्यावर  A-24, B-25, C-26 किंवा D-27 असे नंबर लिहिलेले असतात. A-25 चा अर्थ असा आहे की सिलेंडर 2025 या वर्षात जानेवारी ते मार्च यादरम्यान एक्सपायर होणार आहे किंवा D-27 चा अर्थ असा आहे की सिलेंडर 2027 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात एक्सपायर होणार आहे.

ABCD या अक्ष्रांचा अर्थ काय आहे-

  • आपण कोणताही एलपीजी सिलेंडर घेतला की त्यावर तीन पट्ट्या असतात. त्यावरती एकदम ठळक अक्षरांमध्ये एक कोड लिहिलेला असतो. तो कोड आपणास सांगतो की सिलेंडर एक्सपायर कधी होणार ते.
  • A-24, B-25, C-26 व D-27 असा कोड लिहिलेला असतो. यामध्ये ABCD ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवत असतात, तर त्यापुढे लिहिलेला क्रमांक हा वर्ष दर्शवत असतो.
  • चला तर मग जाणून घेऊया कोडच्या माध्यमातून एक्सपायरी कशी समजते. या कोड मध्येच टेस्टिंग डेट दिलेली असते. त्यालाच Test Due Date असही म्हणटले जाते.

ABCD महिन्यांचे गट-

Aजानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
Bएप्रिल, मे आणि जून
Cजुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
Dऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर

गॅस सिलेंडर किती दिवस वापरता येऊ शकतो-

  • एलपीजी गॅस सिलेंडरची लाईफ ही 15 वर्षे एवढी असते. हे सिलेंडर दोन वेळा तपासणीसाठी पाठवले जातात.
  • पहिली तपासणी 10 वर्ष झाल्यानंतर तर दुसरी तपासणी 5 वर्षांनी केली जाते.
  • तपासणीच्या वेळी सिलेंडरची हायड्रो टेस्ट केली जाते. 5 पट प्रेशरने तो टिकेल का हे तपासले जाते. जर चाचणीत काही अयोग्य आढळल्यास सिलेंडर नष्ट केला जातो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *