आज आपण सदर लेखातून पोकरा योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदाना बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा बदललेल्या नैसर्गिक हवामानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडूळ खत तयार केले जाते. या खतामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते कारण या खतांमध्ये विविध अन्नद्रव्ये, संजीवके तसेच शेतीसाठी उपयुक्त जीवाणू असतात.
सदर योजनेचे उद्दिष्टे-
- यामुळे उत्पादनाची वाढ होण्यास मदत होते. तेही क्मी खर्चात.
- यामुळे पोष्टिक अन्नधान्याचे उत्पादन घेता येते. यामुळे शेत जमिनीची सुपीकता अधिक दीर्घकाळापर्यंत वाढते.
- यामुळे आपणास नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करता येऊ शकते.
- या माध्यमातून शेती केल्यास नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना मदत मिळते व त्यामुळे ते शेतकरी सक्षम बनले जातात.
या योजनेचा लाभ कोणा कोणाला घेता येऊ शकतो-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा 2-5 हेक्टर पर्यंत जमीन धारण असेल तर त्या शेतकऱ्यास वैयक्तिक लाभासाठी 65% अर्थसहाय्य देण्यात येते.
- या योजनेच्या माध्यमातून गावातील अल्पसंख्याक भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 755 अनुदान देय आहे.
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी म्हणजेच अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती ,महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना क्रमानुसार प्राधान्य देण्यात येते.
- ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत युनिट उभारण्याकरता जागा उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर कोणत्या योजनेतून सदर घटकांतर्गत शेतकऱ्याने लाभ घेतलेला नसावा.
- किमान दोन पशुधन गांडूळ खत युनिट उभारल्यानंतर ते नीट सुरू राहण्यासाठी उपलब्ध पाहिजेत.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- जातीचा दाखला (अनुसूचित जाती जमाती असल्यास)
सदर योजनेच्या माध्यमातून किती अनुदान दिले जाते-
- या योजनेचा माध्यमातून सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिटसाठी रु.6,000/- असा खर्च आहे.
- तसेच गांडूळ खत उत्पादन कंपोस्ट युनिटसाठी रु.10,000/- असा खर्च आहे.
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करू घ्यावा व आपले कागदपत्रे अपलोड करावीत.
सदर योजनेच्या माध्यमातून पूर्व संमती मिळाल्यानंतर काय करावे-
- जा शेतकऱ्याला पूर्वसंमती मिळते त्या शेतकऱ्याने तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाची उभारणी करावी.
- त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सामग्री विकत घ्यावी व प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे.
- त्यानंतर प्रकल्प युनिट बांधकाम लाभार्थी यांनी बांधकाम व्यवसायिकाकडून किंवा मजुरीने काम करून घ्यावे.
- जेव्हा गांडूळ युनिट उभारणीचे काम पूर्ण होईल, त्यानंतर अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.
- तसेच त्यासोबत आवश्यक देयके शेतकरी यांनी स्वतःची सही करून ऑनलाईन अपलोड करावी .
- त्यानंतर थोड्या कालावधीमध्ये अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार सलंग्न असेल तेथे जमा करण्यात येईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

