राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये रेशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना आता धान्य ऐवजी पैशाचे वितरण केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत.
राज्यातील 14 जिल्ह्यांचा या योजनेच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी कोण्त्याही जिल्ह्याचे रहिवाशी असाल तर तुम्हाला धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत.
या योजनेच्या माध्यमातून पैशाचे वितरण हे कुटुंबातील महिलेच्या नावाने केले जाणार आहे. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणे अतिशय गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 750 रुपये जर एखाद्या कुटुंबात 5 व्यक्ती असतील तर मिळणार आहेत. म्हणजेच एका व्यक्तीला एका महिन्याला 150 रुपये इतके पैसे या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. एका वर्षाला या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबाला 9,000 रुपये मिळणार आहेत.
खालील 14 जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी पैसे-
- बुलढाणा
- छत्रपती संभाजीनगर
- हिंगोली
- नांदेड
- अमरावती
- वर्धा
- परभणी
- जालना
- अकोला
- लातूर
- बीड
- वाशिम
- यवतमाळ
- धाराशिव
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

