आरटीईच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरती मोफत प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाद्वारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या मार्फत राबवण्यात येते.
या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातून तीन लाखाहून अधिक अर्ज येत असतात. आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू केली आहे. त्यात पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार पर्यंत मुदत देण्यात आली होती.
परंतु आता या प्रक्रियेत नाव नोंदणी करण्यासाठी मंगळवार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे ही प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांनी त्या अगोदरच आपल्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारी
- एकूण शाळा- 9,209
- रिक्त जागा- 1,05,116
- आलेले अर्ज- 2,25,942
पालकांनी हे करावे
- अर्ज भरताना आपल्या राहत्या घराचा पूर्ण पत्ता व गुगल लोकेशन तपासून पहावे.
- आपण भरलेला संपूर्ण अर्ज हा बरोबर आहे की नाही, याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये.
- आपल्या पाल्याचा अर्ज भरताना जन्म दाखल्यावरीलच जन्मतारीख लिहावी.
- एक किलोमीटर एक ते तीन किलोमीटर अंतरावरील शाळा निवडताना कमाल 10 शाळांची निवड करावी.
- अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तयार ठेवावी.
- लॉटरी जाहीर झाल्यानंतर जर कागदपत्रे नसतील, तर प्रवेश रद्द होऊ शकतो.
- एका पालकाने आपल्या पाल्याचे डुप्लिकेट अर्ज भरू नयेत.
- एकाच पाल्याचे दोन अर्ज आढळल्यास दोन्ही अर्ज बाद करण्यात येतील, म्हणजेच असा अर्ज लॉटरी प्रक्रियेत सबमिट केले जाणार नाही.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.