बर्ड फ्यूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढला, केंद्र शासनाचा सर्व राज्यांना खबरदारीचा आदेश.

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या आजाराला कारणीभूत असणारा एच 5 एन 1 हा विषाणू मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये पक्षी व कोंबड्यांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने केंद्र शासनाने शुक्रवारी (31 मे) रोजी सर्व राज्य सरकारांना सतर्क पाळण्याचा आदेश दिला आहे.

काय आहे केंद्राचे आदेश

देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळून आल्यामुळे केंद्र शासनाने शुक्रवारी (31 मे) रोजी सर्व राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोठेही पक्षी किंवा कोंबड्यांचा असामान्यपणे मृत्यू झाल्यास त्याप्रकरणी लक्ष घाला व सावधान रहा. तसेच या संबंधित माहिती ताबडतो पशुसंवर्धन विभागाला कळवा, असे केंद्र शासनाने राज्य सरकारला पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रतिबंधात्मक वस्तूंचा साठा तयार ठेवा

केंद्र शासनाने सर्व राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांना सांगितले देखील आहे, की तुमच्या राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयांना एव्हियन इन्फ्लूएन्झाची चिन्हे आणि लक्षणांची माहिती द्यावी. तसेच सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करा. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिलेले सर्व नियम पाळले जात आहेत की नाही, याची तपासणी करा. लोकांना एव्हियन इन्फ्लूएन्झापासून आपला बचाव कसा करावा याची माहिती द्यावी. त्यावरील औषधे, पीपीई किट, वस्तूंचा साठा तयार ठेवा, असेही केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

100 पट अधिक धोकादायक

एप्रिल 2024 मध्ये युके-आधारित डेली मेलने अहवाल दिला होता, की बर्ड फ्लू हा “कोविड 19” च्या साथीच्या आजारापेक्षा 100 पट वाईट परिस्थिती निर्माण करू शकतो व मृत्यू दर वाढवू शकतो. त्यामुळे तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे की बर्ड फ्लूचा व्हेरिएंट प्रचंड वेगाने पसरत आहे व त्यात जागतिक महामारी निर्माण करण्याची क्षमता आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारला तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनाही सतर्क राहण्याचा व एव्हियन इन्फ्लूएन्झाची म्हणजेच बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *