चालू स्थितीला राज्यात सगळीकडे अतिशय उकाडा जाणवत आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात उष्णतेची लाट पाहण्यास मिळत आहे. मान्सूनची वाटचाल ही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यावर्षी केरळमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सून दाखल झाल्यामुळे गुरुवारी (30 मे) भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या असे जाहीर केले आहे की आणखी एक चांगली बातमी आहे. केरळ नंतर आता मान्सून तमिळनाडूमध्ये दाखल झालेला आहे. याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत देण्यात आली आहे.
20 जूनपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पोहोचणार
आयएमडीच्या अंदाजानुसार केरळमध्ये 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. यंदा मान्सून हा दोन दिवस अगोदरच केरळ मध्ये दाखल झाला आहे. मान्सून हा 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. त्यानंतर 20 जूनपर्यंत उत्तर भारतात मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल. त्यामुळे केरळनंतर आता मान्सून तमिळनाडूत दाखल झाला आहे. तसेच केरळच्या नैऋत्य मान्सूनच्या पावसाचा जोर वाढला आहे.
अति मुसळधार पावसाची शक्यता
केरळमध्ये येत्या काही दिवसात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या दिलेल्या अंदाजात म्हंटले आहे. दोन दिवसांमध्ये कोझिकोडच्या उरुमीमध्ये मान्सूनचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून हा सध्या पूर्वोत्तर दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती मिळत आहे. तर या उलट महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून
भारताच्या ईशान्य कडील राज्यांमधून पुढे सरकणारा मान्सून पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर आता मान्सून बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत मान्सून अंदमान, निकोबार बेटे, केरळ, लक्षद्वीप आणि तमिळनाडू मध्ये पोहोचलेला हवामान खात्याने म्हटले आहे. कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेशात मान्सून 5 जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र व तेलंगणामध्ये पोहोचेल. तर 15 जूनला मध्य प्रदेशात दाखल होऊ शकतो. 20 जून पर्यंत मान्सून उत्तर प्रदेशात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागात द्वारे देण्यात आला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.