अमूल दूध व महामार्गावरील प्रवास दरात वाढ.

सर्व सामान्य जनतेला मागायची चटके सोसावे लागत आहेत. त्यातच गुजरातच्या अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली गेली आहे. तसेच आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील टोल दरामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तीन ते पाच टक्के वाढ लागू होणार आहे. सोमवार रात्रीपासूनच ही दरवाढ होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

आज मंगळवार (ता.4) लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या अगोदरच महागाईने सर्वसामान्यांच्या जीवनात हजेरी लावली आहे. सर्वसामान्य जनता  महागाईने त्रस्त असताना पुन्हा एकदा महागाईचा चटका त्यांना बसणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागील दोन महिन्यापासून टोल दराची अंमलबजावणी पुढे ढकली होती. त्याचबरोबर ही दरवाढ देखील लोकसभा निवडणुकीमुळे बाजूला ठेवली होती, असे सांगण्यात आले आहे.

दर वाढ ही प्रक्रियेचा एक भाग

यासंदर्भात एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की टोल दरात दरवर्षी वाढ होत असते. हा प्रक्रियेचा एक भाग असून  या अगोदरच दर वाढ झाली असती. मात्र आचारसंहितेमुळे टोल वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे मधल्या काळात टोल दरवाढ झाली नाही.

पण आता 3 जून 2024 पासून टोलच्या दरात तीन ते पाच टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. तसेच देशभरातील टोलनाक्यावर सोमवारी रात्रीपासून टोल दरवाढ होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्पादनाच्या करातील वाढीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी मदत मिळावी यासाठी टोल वाढवला जातो, असे रॉयटर्सच्या वृत्तानुसार म्हटले आहे. परंतु विरोधक आणि अनेक वाहनधारक हे दरवाढीवर टीका करत असतात. टोल व इंधन उत्पादनाच्या करात वाढ केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चात वाढ होऊन प्रवाशांवर त्याचा बोझा पडत असतो, असेही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तसेच गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमूल दुधाच्या किमतीतही वाढ केली आहे. ही  वाढ सोमवारी (ता.3) पासून लागू होणार आहे. तर दुधाच्या किंमती वाढल्या असून आता इतर दूध संघ देखील दर वाढवण्याची शक्यता आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *