प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना. 20 लाख रुपयांपर्यंत मिळवा कर्ज.

आज आपण सदर लेखातून आपल्याला फायद्याची ठरणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करावा, तसेच याबद्दलची संपूर्ण माहिती.

सदर योजनेची माहिती-

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो. या योजनेच्या माध्यमातून कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते. यामुळे त्याचा वापर करून त्या व्यक्तीला उद्योगासाठी आवश्यक तो खर्च करतात येतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल व त्यासाठी तुम्हाला निधीची गरज भासत असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून 5 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता.

या योजनेच्या माध्यमातून लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल व भांडवलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर केंद्र सरकारच्या योजनेद्वारे तुम्ही तुमचे स्वप्न आता साकार करू शकता.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • फिंगर प्रिंट व स्वाक्षरी
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *