खरीप हंगामामध्ये प्रत्येक वर्षी शेतकरी हे मका लावत असतात. तसेच मागील तीन वर्षापासून मका या पिकाला बाजारात उत्तम दर मिळत आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर छिंदवाड्यातील कृषी संशोधन केंद्राने काळ्या म्हणजेच रंगीत मक्याचे संशोधन केले आहे. काळ्या मक्यामध्ये जास्त तांबे व लोहाचे प्रमाण आहे, हे लक्षात घेऊन छिंदवाड्यातील कृषी संशोधन केंद्राने काळ्या मक्याची नवीन जात काळया मका 1014 विकसित केली आहे.
मका पिक लागवड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बेबीकॉर्न व स्वीट कॉर्न या मक्याची लागवड देशभरात केली जाते. आता शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी काळ्या मक्याची लागवड देखील करू शकतात. काळ्या मक्याचे विशेष महत्त्व म्हणजे ते तयार होण्यासाठी केवळ 90 ते 95 दिवस लागतात व तसेच त्याचे उत्पादन इतर पिकंपेक्षा जास्त आहे.
भारतात काळ्या मक्याच्या एका कणसाची किंमत 200 रुपये आहे. काळ्या मक्याचे वैशिष्ट्ये म्हणजे ही मका पौष्टिकता आणि उत्पादनाने महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर या मक्याचा वापर हेल्थी उत्पादनामध्ये वापरली जाते. ही मक्याची पहिली जात आहे जी पौष्टिक व जैविक-फोर्टीफाईड आहे. मक्याच्या दाण्यांचा रंग हा सामान्यत: पिवळा असतो. परंतु या नवीन मकेच्या जातीचा रंग हा काळा, लाल आणि तपकिरी असतो.
या मक्याची जात परिपक्व होण्यासाठी 95 ते 97 दिवस लागतात. या मक्याचे एकरी 8 किलो बियाणे लागवड करून शेतकरी 26 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवू शकतात. तसेच मक्याचे तंतू वाढण्यास सुमारे 50 दिवस लागतात. काळ्या मक्याच्या लागवडीसाठी उष्ण हवामान योग्य मानले जाते. जेव्हा मक्याचे रोप तयार होते, तेव्हा त्याला जास्त पाणी द्यावे लागते.
या जातीची लागवड ही ओळीमध्ये केली जाते. एका रोपांमध्ये दुसऱ्या रोपापर्यंत सुमारे 60 ते 75 सें.मी अंतर ठेवावे लागते. काळी मका ही खोड रोगास सहनशील आहे. पावसाच्या प्रदेशासाठी विशेषतः पठारी भागात अतिशय योग्य ही मक्याची जात आहे. तसेच पावसाळ्यात देखील या मक्याच्या जातीची लागवड करू शकता. या मक्याच्या जातीची ऑनलाईन वेबसाईटवर एका कणसाची किंमत दोनशे रुपये आहे. काळा मक्याचा भाव हा नेहमी सामान्य मका पेक्षा जास्त असतो.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.