कुक्कुटपालन करण्यासाठी आता मिळणार 25 लाख रुपये पर्यंत अनुदान.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कुक्कुटपालन करण्यासाठी शासनाकडून 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे, त्याची अर्ज प्रक्रिया कशी आहे व कोठे अर्ज करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची माहिती-

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. आता 25 लाख रुपये पर्यंत शासन या योजनेला अनुदान देणार आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा मिळून पशुपालकांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र शासन ही योजना राबवत आहे.

ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. त्यामध्ये 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान केंद्र शासन देते आहे. म्हणजेच या योजनेसाठी 50 टक्के अनुदान शासन देत आहे. त्यासाठी संबंधित व्यावसायिकाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा. जे बेरोजगार तरुण आहेत ते देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *