आपण या लेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात या अगोदर राबवण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेवर मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारणे असे प्रकार विमा कंपन्यांकडून होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन त्यांना अनेक अडचणीच्या परिस्थितींना तोंड द्यावे लागत असते. अशा अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य करून त्यांना संकटातून बाहेर काढण्याचा व त्यांना मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सूरु करण्यात आली आहे.
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- राज्यातील सर्व विहित धारक खातेदार शेतकरी
- ज्या कुटुंबाची विहीर धारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती) अशा 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण दोन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सदर योजनेच्या समाविष्ट बाबी-
- रस्ता/रेल्वे अपघात
- पाण्यात बुडवून मृत्यू, जंतुनाशके हातळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
- विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
- वीज पडून मृत्यू
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- सर्पदंश/विंचुदंश
- नक्षलाईटकडून झालेली हत्या
- जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावल्यामुळे जखमी/मृत्यू
- बाळांतपणातील मृत्यू
- दंगल
- अन्य कोणतेही अपघात
सदर योजनेचेच्या लाभाचे स्वरूप-
- अपघाती मृत्यू – रु.2,00,000/-
- दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय- रु.2,00,000/-
- एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास- रु.2,00,000/-
- एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास- रु.1,00,000/-
सदर योजनेची कागदपत्रे-
- सातबारा उतारा
- मृत्यूचा दाखला
- शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्र.6 नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
- शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड
नोट-
- सदर योजनेचा अर्ज अपघात झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
- वरील माहिती जर आपल्याला आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now