आता आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक दस्तावेज आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक कागदपत्रे म्हणून वापरले जाते. पण आधार कार्डचे किती प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही कधी ‘निळ्या आधार कार्ड’ बद्दल ऐकले आहे का? चला तर मग या लेखातून जाणून घेऊया ‘ब्लू आधार कार्ड’ म्हणजे काय? तसेच हे दुसऱ्या आधार कार्ड पेक्षा वेगळे कसे आहे.
ब्लू आधार कार्ड माहिती-
- लहान मुलांसाठी 2018 मध्ये UIDAI ने आधार कार्डची सुविधा सुरू केली आहे. त्यालाच ‘ब्ल्यू आधार कार्ड’ किंवा ‘बालक आधार कार्ड’ असे म्हणतात.
- या आधार कार्डचा रंग निळा असल्यामुळे त्याला ‘ब्ल्यू आधार कार्ड’ असे नाव दिले गेले आहे.
- आधार कार्ड 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या बालकांसाठी बनवले जाते.
- तसेच ते 5 वर्षानंतर अपडेट केले जाऊ शकते.
ब्ल्यू आधार कार्डसाठी बायोमेट्रिकची आवश्यकता का नाही?
- ‘ब्ल्यू आधार कार्ड’ मध्ये सामान्य आधार कार्ड पेक्षा थोडा बदल आहे.
- 5 वर्षाखालील मुलांच्या ‘ब्ल्यू आधार कार्ड’ साठी बायोमेट्रिक्स घेतले जात नाही.
- लहान मुलांच्या UID वर लोकसंख्याशास्त्रीय माहिती तसेच ते त्यांच्या पालकांच्या UID शी जोडलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाते.
- या मुलांची बायोमेट्रिक 5 व 15 वर्षांची झाल्यावर अपडेट करावे लागते.
ब्लू आधार कार्डसाठी अप्लाय करण्याची पद्धत-
- सर्वात अगोदर UDI वेबसाईट uidai.gov.in वर जावे.
- आधार कार्ड नोंदणी पर्याय निवडावा.
- त्यात बालकाचे नाव, पालकांचा फोन नंबर व तसेच इतर सर्व माहिती भरावी.
- त्यानंतर आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट पर्यावर क्लिक करावे.
- जवळचे नाव नोंदणी केंद्र शोधा व भेटीची तारीख तसेच वेळ घ्या.
- तुमच्या स्वतःचे आधार कार्ड, बालकाचे जन्म प्रमाणपत्र, संदर्भ क्रमांक इत्यादी घेऊन आधार केंद्रावर जावे.
- नंतर तुम्हाला एक पावती क्रमांक दिला जाईल, ज्याद्वारे तुम्ही आढावा घेऊ शकता.
नोट- जर तुम्हाला वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now
Hi