बेबी केअर किट योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसुती वेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला रु.2,000/- किमतीचे बाळाच्या उपयोगातील वस्तू म्हणजेच ‘बेबी केअर किट’ चा लाभ देण्यात येतो.
  • महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी ‘बेबी केअर किट’ मिळवण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी करावी लागेल, तसेच ज्या महिलांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी प्रस्तुती झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत अर्ज करावा.

सदर योजनेचा उद्देश-

  • मुलांना रुग्णालयांमध्ये जन्म देण्यास प्रोत्साहन मिळावे.
  • शिशु मृत्युदर कमी करणे.
  • बाळंतीण महिला व नवजात शिशु यांची सुरक्षितता.

सदर योजनेतंर्गत दिले जाणारे साहित्य-

हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग दिली जाते.

  • नवजात बालकाचे कपडे
  • टॉवेल
  • मच्छरदाणी
  • ब्लॅंकेट
  • प्लास्टिक चटई
  • अंगाला लावायला तेल
  • नेल कटर
  • खेळणी
  • हातमोजे
  • पायमोजे
  • आईसाठी हात धुण्याचे लिक्विड
  • बॉडी वॉश लिक्विड
  • झोपण्याची लहान गादी इत्यादी

सदर योजनेची कागदपत्रे-

  • आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक)
  • पतीचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • MCP कार्ड (माता बाल संरक्षण कार्ड)
  • अर्जदाराचा फोटो

नोट

  • अधिक माहितीसाठी  aaplesarkar.mahaonline.gov.in/en  या संकेतस्थळाला भेट द्या.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *