कुसुम सोलार पंप योजना माहिती 2023

सरकारने महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी राज्य सरकार सौर पंप उपलब्ध करून देणार आहे.या योजनेतंर्गत नवीन सौर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जाईल. कुसुम सोलार पंप योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी योजनेची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण या लेखातून सदर योजनेसाठी लागणारी पात्रता, अर्ज कुठे करावा, लागणारी कागदपत्रे इ. माहिती जाणून घेणार आहोत.

सदर योजनेचे फायदे

  • दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होईल.
  • विना व्यत्याय अखंड वीज पुरवठा.
  • वीजबिलापासून मुक्तता.
  • डिझेल पंपासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चापासून मुक्त होता येईल.
  • शेतकऱ्याचा उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
  • डिझेल पंपामुळे होणारे वायू प्रदूषण कमी होईल.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे, त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवले जाईल.
  • शासनावरचा विजेचा भार कमी होईल.
  • व्यवसायिक, औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांवरील सबसिडीचा भार कमी होईल.
  • शेतकऱ्यांना जोखीम मुक्त उत्पादन प्रदान करते.
  • शेतीत कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास मदत करते.

सदर योजनेची पात्रता

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाण्याचा पक्का स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंप नवीन वीज जोडणी करता अर्ज केलेला आहे असे पेड प्रलंबित ग्राहक पारंपारिक वीज जोडणी शेतकऱ्याकडे नसावी.
  • ज्या शेतकऱ्यांचे यापूर्वी कोणत्याही योजनेतंर्गत विद्युतीकरण झाले नाही किंवा वन विभागामुळे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही, तसेच धडक सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी लागू आहे.
  • या योजनेत प्राधान्य दुर्गम भागातील व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
  • शेत जमिनीचे क्षेत्र जर 2.5 एकरपर्यंत असेल तर शेतकऱ्यांना 3 HP  क्षमतेचा पंप दिला जाईल.
  • शेत जमिनीचे क्षेत्र जर 2.5 ते 5  एकरपर्यंत असेल तर शेतकऱ्यांना 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
  • शेत जमिनीचे क्षेत्र जर 5 एकरपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
  • अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्या करिता 5% लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील.

सदर योजनेची सौर पंप किंमत व लाभार्थी हिस्सा-

  सौर पंप क्षमता  सौर पंप किंमतलाभार्थी हिस्सा (सामान्य श्रेणी)लाभार्थी हिस्सा (SC/ST श्रेणी)  
  3HP  रु. 1,93,803/-  रु. 19,380/-  रु. 9,690/-
  5HP  रु. 2,69,746/-  रु. 26,975/-  रु. 13,488/-
  7.5HP  रु. 3,74,402/-  रु. 37,440/-  रु. 18,720/-

सदर योजनेच्या अटी-

  • महाराष्ट्र राज्याचा अर्जदार हा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांना एका शेतासाठी या योजनेचा अर्ज करता येऊ शकतो व त्याचा लाभ घेता येऊ शकतो.
  • सौर कृषीपंप हा लाभार्थ्यास हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षाची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील.
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतात बोरवेल, विहीर, नदी इत्यादी शाश्वत पाण्याचा  स्रोत असणे आवश्यक आहे. .
  • कोणत्याही वर्गातील क्षेत्रांमध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये  सौरपंप देण्यात नाही येणार.

सदर योजनेचे कागदपत्रे-

  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • शेतकरी SC/ST प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र.
  • कृषी पंपाचे वीज बिल.
  • मोबाईल नंबर.
  • रेशन कार्ड.
  • निवास प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • ई-मेल आयडी.
  • सातबारा उतारा (विहिरीची किंवा बोअरची नोंद असणारा)
  • सामायिक सातबारा असेल तर 200/-  रुपयांच्या बॉडवर इतर भोगवटदारांचा ना हरकत प्रमाणपत्र

नोट-  सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.  kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B 

जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *