श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती

    श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना राज्यातील निराधार वृद्ध नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला दरमहा रु.1500/- ऐवढे आर्थिक सहाय्य देण्यात येते .

सदर योजनेतंर्गत गट(अ) आणि गट(ब) असे दोन गट केले गेले आहेत-

  • गट(अ‍)- या गटामध्ये जे जेष्ठ स्त्री व पुरुष आहेत, त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे.
  • गट(ब)- या गटात जे ज्येष्ठ स्त्री व पुरुष यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाही अशांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सदर योजनेचा उद्देश-

  • ज्येष्ठ नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणावरती अवलंबून राहावे लागू नये, म्हणजेच त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
  • आपल्या राज्यातील वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
  • वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे.
  • ऑनलाईन प्रक्रियेमुळे आपण घरी बसल्या बसल्याही मोबाईलच्या साह्याने किंवा लॅपटॉपच्या साह्याने हा अर्ज भरू शकतो.
  • यामुळे अर्जदाराचा पैसा व वेळ वाचतो. तसेच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासत नाही.
  • या योजनेतंर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम DBT च्या साह्याने लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सदर योजनेच्या अटी व पात्रता-

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात 15 वर्षापासून वास्तव्य करत असावा.
  • ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत लाभार्थ्याच्या कुटुंबाचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे.
  • जे लाभार्थी BPL नाहीत, त्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
  • जर अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेतंर्गत पेन्शन योजनेचा लाभ घेतला असेल, तर अशा नागरिकांनला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर अशा व्यक्तीस अर्ज करता येणार नाही.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाचा दाखला
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो इत्यादी.

सदर योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  aaplesarkar.mahaonline.gov.in/en/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयास भेट द्यावी.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *