सदर योजनेची माहिती-
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील निराधार नागरिकांना अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून जे अनुदान मिळत होते, त्यात वाढ झालेली आहे.
या अगोदर लाभार्थ्यांना रु.1,000/- अनुदान म्हणून दिले जात होते. परंतु आता ते वाढवून रु.1,500/- एवढे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना अर्थसाह्य देणे हा आहे.
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा, योजनेची लाभार्थी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागतील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येऊ शकतो.
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- विधवा
- दिव्यांग
- अनाथ
- दुर्धर आजार ग्रस्त
- अत्याचारित महिला
- वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
- देवदासी
- परित्यक्ता
- 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस इत्यादी
सदर योजनेच्या अटी-
- अर्जदार हा किमान महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा.
- जर लाभार्थी हा दिव्यांग असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल रु.50,000/-ऐवढी असावी.
- इतर सर्व लाभार्थ्यांकरता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कमाल रु.21,000/- ऐवढी आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय किमान 18 ते 65 वर्ष असावे.
- अर्जदार ह्या विधवा महिला असतील, तर त्यांच्याकडे पतीच्या मृत्यूचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा दिव्यांग असेल तर त्याच्याकडे किमान 40% जिल्हा शलचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला असणे आवश्यक आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- विहित नमुन्यातील अर्ज
- अनाथ दाखला
- वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- दुर्धर आजार प्रमाणपत्र
सदर योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज कसा करावा-
- या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपण सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयास संपर्क करावा.
- या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now