जर तुम्ही रेशन कार्डचे धान्य घेत असाल तर लवकरात लवकर करा हे काम; नाहीतर धान्य मिळणार नाही!

आज आपण या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची तसेच कामाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल व तुम्ही वेळेवर राशन देखील घेत असाल, तरीही ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊया शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे, तसेच यासाठी कोणते काम करायचे आहे.

    केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात रेशन कार्ड धारकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला हे काम करणे अतिशय गरजेचे आहे. तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे रेशन बंद होऊ शकते. म्हणूनच भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी हे काम लवकरात लवकर करून घ्या.

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे.

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सरकारने अजून वाढवलेली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड आधार कार्डशी वेळेतच लिंक नाही केले, तर तुम्हाला या सुविधांपासून वंचित राहावे लागेल.

अगोदर सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ठेवली होती. परंतु ती वाढवून आता 31 डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *