केंद्र सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत 2023-24 मध्ये घोषणा केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक व्याजदर 7.5% दिले जाते. तिमाहीच्या आधारावर या योजनेचे व्याजदर जमा केले जाते. या योजनेमध्ये खातेदार वार्षिक रु. 1000/- जमा करू शकतो. ही योजना 2 वर्षासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत. या स्कीमचा मुख्य उद्देश महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
सदर योजनेसाठीची खाते उघडण्याची ठिकाणे-
- सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका व ज्या इच्छुक असतील त्या खाजगी क्षेत्रातील बँका यांनाही खाती उघडण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
- तसेच देशभरातील पोस्ट ऑफिस मध्ये देखील ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
सदर योजनेची परतावा मिळण्याची प्रक्रिया-
- या योजनेत 2 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. मॅच्युरिटी नंतर या योजनेचा 2 वर्षाच्या व्याजाचा लाभ देण्यात येतो.
- मॅच्युरिटी पूर्ण झाली की तुम्हाला गॅरेंटेड इन्कम मिळतो.
- जर तुम्ही या योजनेत 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली, तर रु.3,750/- ऐवढे तुम्हाला पहिल्या तीन महिन्यानंतर व्याजदर मिळेल.
- जर तुम्ही दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस यात पुन्हा गुंतवणूक केल्यास रु.3,820/- ऐवढे व्याजदर मिळते.
- या हिशोबानुसार या योजनेच्या मॅच्युरिटी नंतर रु. 2,32,044/- ऐवढे एकूण रक्कम मिळेल.
सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज़ फोटो
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद !

