आज आपण नवीन ऑनलाईन रेशन कार्ड आपणास कसे मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड काढण्यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, रेशन कार्ड मिळण्यासाठी किती दिवस लागतील हे या लेखातून पाहणार आहोत.
आता नवीन रेशन कार्ड हे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साह्याने अर्ज करून काढता येते. या अगोदर रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे घालावे लागत होते. परंतु शासनाने यात बदल करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे.
आता रेशन कार्ड काढण्यासोबत दुबार किंवा विभक्त रेशन कार्ड, नावे कमी करणे किंवा नावे वाढवणे, पत्ता बदलणे, नावामधील चुका सुधारने यासारख्या सर्व सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जर आपणास रेशन कार्ड काढायचे असेल तर आपल्या जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे nfsa.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नवीन रेशन कार्ड तसेच इतर दुरुस्त्या करणाऱ्यांनाही ते 30 दिवसात मिळेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये खर्च देखील येऊ शकतो.
रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पॅन कार्ड
- गॅस कनेक्शन माहिती
- बँक पासबुक व त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- सातबारा उतारा
- कुटुंबातील सर्वांची नावे असलेले रेशन कार्ड
- लाईट बिल
- 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झेरॉक्स स्वाक्षरी इत्यादी.
नोट- जर आपणास ही माहिती आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद !

