नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेतंर्गत मिळणार 10 लाख रुपयांचे कर्ज

   केंद्र सरकारने व्यवसायिकांसाठी आणलेले एका योजनेबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. भरपूर लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु आर्थिक अडचणीमुळे म्हणजे पैशाच्या अभावामुळे तो सुरू करता येत नाही. म्हणून कर्ज घेण्यासाठी लोक बँकांकडे वळतात. परंतु कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कर्ज मिळू शकत नाही.

   या सर्व बाबींचा विचार करून देशातील व्यवसायिकांना चालना मिळावी यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. चला तर मग आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सदर योजनेची माहिती-

  • ही योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार 50 हजार ते 10 लाख रुपयांर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय 5 वर्षांसाठी देते.
  • तसेच हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रोसेसिंग शुल्क भरावा लागत नाही.
  • या योजनेचा फायदा सार्वजनिक क्षेत्रातील बँका व्यतिरिक्त सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लोगो वित्त बँका आणि NBFC कडून देखील कर्ज मिळते.
  • वेगवेगळ्या बँकांकडून या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या असतो. साधारणता या कर्जावर 10 ते 12 टक्के व्याजदर बँका आकारत असतात.
  • जे लोक अगोदर व्यवसाय करत असतील, त्यांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज दिले जाते.
  • या योजनेसाठी 24 ते 70 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.

सदर योजनेचे प्रकार-

  1. शिशु कर्ज- या प्रकारात 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  2. किशोर कर्ज- या प्रकारात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिली जाते.
  3. तरुण कर्ज- या प्रकारात 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

सदर योजनेचे कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • अर्जदाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • प्रकल्प अहवाल
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  • मागील 2 वर्षाची आयकर पावती
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट

सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-

आपल्या जवळील सरकारी किंवा खाजगी बँकेत आपण अर्ज करू शकतो.

  • नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *