इंदिर गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना माहिती 2023

     आज आपण या लेखातून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, पात्रता, उद्दिष्टे, कागदपत्रे इत्यादी बद्दल माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.

     पतीच्या अचानक मृत्यूमुळे महिलांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैशांची आवश्यकता असते. या सगळ्याचा विचार करून सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना दरमहा रु.1,500/- एवढी आर्थिक मदत दिली जाईल.

सदर योजनेचे उद्दिष्टे

  • या योजनेमुळे विधवा महिलांना दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • विधवा महिलांचे राहणीमान व जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • विधवा महिलांना आत्मनिर्भर व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळेल.

सदर योजनेची पात्रता

  • विधवा महिला ही महाराष्ट्र राज्याची किमान 15 वर्षापासूनची  रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ज्या विधवा महिलांचे वय हे 40 ते 79 वर्षाखालील आहे, त्यांनाच या योजनेतंर्गत लाभ घेता येऊ शकतो.
  • ज्या विधवा महिला दारिद्र्यरेषेखालील असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला
  • विधवा महिलेच्या पतीचा मृत्यूचा दाखला व मोठ्या मुलाच्या वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

  • या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.
  • या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/  या संकेत स्थळाला भेट द्या.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *