राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती

   ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून ती सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा म्हणजे कर्तव्यक्तीचा मृत्यू झाल्यास (स्त्री/पुरुष) अशा कुटुंबास त्वरित आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात येते.

   आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बहुतेक वेळा कुटुंबाचा संपूर्ण भार हा कर्त्या व्यक्तींवर अवलंबून असतो. परंतु जर त्या व्यक्तीचाच अचानक मृत्यू झाला तर कुटुंबासमोर उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणाकडून पैसे किंवा कर्ज घेण्याची गरज भासू नये, म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे.

   या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच BPL कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वर्ष वयोगटातील कर्ता (स्त्री/पुरुष) मरण पावल्यास कुटुंबीयांना एक रकमी रु.20,000/- एवढे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

सदर योजनेचे वैशिष्ट्ये-

  • महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची या योजनेमुळे गरज भासत नाही.
  • या योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ त्वरित घेता येईल.
  • या योजनेतून मिळणारी आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सदर योजनेचा लाभ-

  • या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री-पुरुषाच्या विदुरास, विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आई-वडिलांना इत्यादींना दिला जातो.
  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना दिला जातो.
  • जे नागरिक 18 ते 59 वयोगटातील असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.

सदर योजनेची कागदपत्रे-

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • तलाठी यांच्याकडील जबाब, पंचनामा, अहवाल
  • मृत्यूचा दाखला
  • जन्म मृत्यू नोंद वही मधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकित प्रत
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी

सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा-

  • सदर योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.
  • सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/  या संकेत स्थळाला भेट द्या.

नोट- वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *