कांदा चाळ अनुदान योजना 2023; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती

     कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.

    या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने कांदा अनुदान योजना सुरू केली आहे. कांदा चाळ या प्रकल्पाच्या माध्यमातून कांद्याची साठवणूक करता येते. कांदा चाळीमुळे शेतकऱ्यांना भाव नसतानाही कांदा बाजारात आणावा लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. या योजनेसाठी सर्वच शेतकरी बांधव ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

सदर योजनेची पात्रता

  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे. तसेच त्याची 7/12 उताऱ्यावर नोंद असावी.

कांदा चाळीसाठी लागणारे आकारमान, येणारा खर्च, मिळणारे अनुदान-

आकारमान (मेट्रिक)  खर्च (प्रति चौरस मीटर)   अनुदान
      5  रु. 35,000/- रु.17,500/-
     10  रु. 70,000/- रु. 35,000/-
     15  रु. 1 लाख 5 हजार रु. 52,500/-
     20  रु. 1 लाख 40 हजार  रु. 70,000/-
     25  रु. 1 लाख 75 हजार रु. 87,500/-

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • आधार कार्डची छायांकित प्रत
  • आधार कार्डशी संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांसाठी)
  • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-2)
  • 8-अ प्रमाणपत्र
  • उपकरणांचे कोटेशन किंवा बिल

नोट-

  • सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळाला भेट द्या.
  • वरील माहिती आवडली असल्यास इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *