इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती

   आपले सरकार हे अनेक प्रकारच्या योजना गरजू लोकांसाठी राबवत असते. अशीच एक योजना राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजना असे आहे. आपल्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तींची संख्या देखील आहे.

   या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना दरमहा रु.1,500/- इतके आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आर्थिक साह्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा व काम पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, त्याचबरोबर त्यांचे जीवनमान सुधारेल.

सदर योजनेची पात्रता-

  • किमान 15 वर्षापासून दिव्यांग व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंब यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा 18 ते 79 वर्ष वयोगटा दरम्यान असावा.
  • अर्जदार व्यक्ती हा 80% पेक्षा अधिक अपंग व बहु अपंग असावा.

सदर योजनेचे कागदपत्रे-

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • अपंगत्वाचा दाखला
  • दारिद्र्यरेषेचा दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र यांना भेट द्या.
  • या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/  या संकेतस्थळाला भेट द्या.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्कीच शेअर करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *