आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना 2024. लगेच करा अर्ज.

सदर योजनेची माहिती

    आज आपण सदर लेखातून आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकार मार्फत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी फायद्याचे आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात अशा लोकांना सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील करता येतो.

    या योजनेचा माध्यमातून अर्जदारांना 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार सुविधा उपलब्ध होते. सरकारशी  संलग्न असणाऱ्या कोणत्याही दवाखान्यात जाऊन आपणास या योजनेचा लाभ घेता येतो. 1350 पेक्षा जास्त आजारांवर या कार्डच्या माध्यमातून उपचार करतात येतो. या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण एका कुटुंबासाठी असणार आहे.तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी देखील या कार्डचा लाभ घेता येतो.

सदर योजनेची कागदपत्रे-

  • अर्जदाराचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र इत्यादी
  • फोटो
  • फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी इतर कागदपत्रे ही सोबत ठेवावीत.

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा-  

  • आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे मोबाईलद्वारे देखील काढता येऊ शकते.
  • सर्वात अगोदर आपल्याला Play Store वरती जाऊन Ayushman App Download करायचे आहे.  
  • App Open झाल्यावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. त्यातील Beneficiary हा पर्याय निवडावा.
  • नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP Verified करायचा आहे.
  • यानंतर आपल्या कुटुंबातील सर्वांची नावे खाली दिसतील. जर ती नाही दिसली तर आपण त्याच्यात Add पण करू शकता.  
  • यानंतर तुमच्या नावासमोरील Apply बटन वर क्लिक करावे.
  • नंतर तुमच्या समोर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. तो तुम्ही काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यात तुमची सर्व माहिती व्यवस्थित टाकायचे आहे व त्यानंतर तुमचे ओळखपत्र तसेच Live Photo Capture करून तो अपलोड करायचा आहे.
  • एवढी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर फॉर्म Submit करायचा आहे. जर तुमच्याकडे जास्त Points असतील तर तुमचा अर्ज लगेच Approved होतो.
  • Approval आले की तुमचे Ayushman Bharat Health Card Download करायचे आहे.

नोट-

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी pmjay.gov.in   या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *