सदर योजनेची माहिती-
- आज आपण सदर लेखातून “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मंगळवारी राज्य सरकारकडून लोकसभा निवडणूक पूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर केला गेला आहे.
- हा अर्थसंकल्प 4 महिन्यासाठींचा आहे. तसेच जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून 8 लाख 50 हजार नवीन कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच येत्या 2 वर्षात सर्व उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.
- ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेच्या माध्यमातून 7 हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे ध्येय आहे.
सदर योजनेची पात्रता–
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाण्याचा पक्का स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक वीज जोडणी शेतकऱ्याकडे नसावी.
- ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा मागेल त्याला सोलार पंप योजना टप्पा 1 व 2 या अंतर्गत अर्ज केलेले परंतु अजून पर्यंत ते मंजूर न झालेले अर्जदार.
- शेत जमिनीचे क्षेत्र जर 2.5 एकरपर्यंत असेल तर शेतकऱ्यांना 3 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
- शेत जमिनीचे क्षेत्र जर 2.5 ते 5 एकरपर्यंत असेल तर शेतकऱ्यांना 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
- शेत जमिनीचे क्षेत्र जर 5 एकरपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.
सदर योजनेचे वैशिष्ट्ये–
- सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याला कृषी पंप किंमतीच्या 10% लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे.
- अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्या करीता 5% लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील.
सदर योजनेचे कागदपत्रे-
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- शेतकरी SC/ST प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र.
- कृषी पंपाचे वीज बिल.
- मोबाईल नंबर.
- रेशन कार्ड.
- निवास प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज फोटो.
- ई-मेल आयडी.
- 7/12 उतारा (विहिरीची किंवा बोअरची नोंद असणारा)
- सामायिक सातबारा असेल तर 200/- रुपयांच्या बॉडवर इतर भोगवटदारांचा ना हरकत प्रमाणपत्र
नोट-
- सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now