गोशाळांना देशी गायी संवर्धनासाठी अनुदान.
सोमवारी (ता.30) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन-पोषणासाठी प्रति दिवस, प्रति गाय 50 रुपये अनुदान देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देशी गाईंचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना राज्यमाता गोमाता दर्जा देण्याचा शासन आदेशही जाहीर करण्यात जाहीर करण्यात आलेला आहे. 2019 मधील 20व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या 46 लाख 13 …




