संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीच्या साह्याने अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार!

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट आता डीबीटीच्या साह्याने लाभ हस्तांतरित करण्याकरता संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबवल्या जातात. सदर योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2024 पासून पात्र लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वाटप डीबीटी पोर्टल मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण हे DBT Portal द्वारे करण्याबाबत शासन निर्णय खालील शासन निर्णयांमध्ये अधिक्रमित करण्यात आलेला आहे. क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19.12.2024 पर्यंत DBT पोर्टलच्यामार्फत On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्यानुसार DBT पोर्टलवर On Board (Aadhar Validate झालेल्या + Aadhar Validate न झालेल्या) लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसाह्य DBT पोर्टलमार्फत वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसेच जे लाभार्थी On Board नाहीत त्यांना पूर्वीच्या पारंपारिक पद्धतीने अर्थसाह्य वितरित केले जाणार आहे.

बिम्स या प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्याची सुविधा जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असणार आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरावी. तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यासाठी तालुका/मंडळस्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी असे सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. दिनांक 19.12.2024 पर्यंत झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी रु.408.13 कोटी एवढ्या रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

त्यामुळे सदर योजने करता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण हे डीबीटीद्वारे करण्याबाबत महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व सर्व जिल्ह्याधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरली गेली याची खात्री करावी.

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसाहयाचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात यावे या बाबतीतील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *