पेमेंट केल्यानंतर प्रत्येकाला सोलर मिळतोच का?

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करताना काही त्रुटी दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या त्रुटी आढळून येत आहेत त्यांना परत कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर आम्ही पेमेंट केले आहे, तर आता अडचण कोणती? तसेच या योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे अमलबजावणीची प्रक्रिया केली जाते. पेमेंट केले तर सोलर मिळणारच का? पेमेंट केलेल्या प्रत्येकाला सोलर मिळतोच का? पेमेंट केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते? हे सर्व आपणास सदर लेखातून थोडक्यात जाणून घेणार आहोत.

अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करत्या वेळेस काही समस्या दिसून आल्या तर त्या शेतकऱ्याला कागदपत्रे अपलोड करायला सांगण्यात येते. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अर्जाला पेमेंटचा ऑप्शन देण्यात येतो. व त्यानंतर मागणी केल्याबरोबर डिमांड भरायला सांगण्यात येते. म्हणजेच जर तुम्ही अर्ज केलाय व अर्जाची स्थिती तुम्ही जर एम के आयडी टाकून पाहिली तर तुम्हाला तुमचा अर्ज फक्त आता ड्राफ्ट मोडमध्ये दिसणार आहे. याचा अर्थ असा की अर्ज त्याच स्वरूपात आहे, तो आणखी सबमिट झालेले नाही, असे दाखवले जाते. जर तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पेमेंट हे करावेच लागणार आहे.

त्या ठिकाणी पेमेंट करण्यासाठीचा पर्याय दिला जाईल. आपण अर्ज केल्यानुसार पेमेंट करावे लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर लगेच सोलर मिळतोच का किंवा सोलर मिळणारच का? पुन्हा व्हेंडर निवड येते का? योग्य असलेल्या अर्जाला व्हेंडर निवड पर्याय देण्यात येतो. ज्या अर्जामध्ये काही अडचनी असतील म्हणजेच पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल, आधार कार्ड व सातबारावरील नाव बदल असेल, सामायिक जमीन असल्यास सामायिक संमती पत्राची जोडणी नसेल केलेली अशी वेगवेगळी कारणे देण्यात येतात, अशा अर्जामधून त्रुटी काढल्या जातात.

वेंडरची निवड-

जर तुमच्या अर्जामध्ये अशी काही अडचण आली तर कागदपत्रे परत पाठवण्यास सांगितली जातात. यामुळे तुमचा अर्ज पुढच्या प्रक्रियेसाठी समाविष्ट केला जाईल. म्हणजेच पेमेंट केल्यानंतर सुद्धा पूर्ण तपासणी झाल्यानंतरच अर्ज पुढे जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज मंजूर होईल व अर्ज सबमिट झालेला असेल. शिवाय पेमेंट झाल्याचेही दाखवले जाईल. एवढे सगळे झाले म्हणजे पुन्हा सोलर मिळेल की नाही? याच्यानंतर पुढची प्रक्रिया असते ते म्हणजे वेंडरची निवड. ज्या लाभार्थ्यांनी सोलर पेमेंट केलेले आहे अशा लाभार्थ्याना पुढे पुरवठादाराची निवड करण्यास सांगितले जाते.

जॉईंट सर्वेक्षण-

त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून जॉईंट सर्वेक्षण करण्यात येते. ही प्रक्रिया सोलर इन्स्टॉलेशन होण्याच्या अगोदर केली जाते. यात सोलर कंपनीचे प्रतिनिधी, एमएसईबीचे कर्मचारी व शेतकरी मिळवून जॉईंट सर्वेक्षण करतात. यावेळी अनेक बाबी ह्या तपासल्या जातात. यामध्ये काही अडचण आली तर पुन्हा अर्ज होल्डवर जाण्याची शक्यता असते. लगेच सुटणाऱ्या त्रुटी असतील तर प्राधान्याने त्या सोडवण्यात येतात. जॉईंट सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनीच्या माध्यमातून साहित्य पाठवण्यात येते व सोलर इन्स्टॉलेशन करण्यात येतो.

सोलर इन्स्टॉलेशन नंतर-

सोलर इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्या लाभार्थ्याबरोबरचा सोलरचा फोटो किंवा इन्स्टॉल केलेल्या सोलरचा फोटो हा सबमिट करण्यात येतो. तसेच कंपनीच्या नावाचा एक सोलर लागल्याचा एक रिपोर्ट काउंट केला जातो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन लाख सोलर पंप इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. नंतर अधिकारी भेट देतात व सोलर व्यवस्थांची इस्टाल झाल्याची खात्री केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याला पुढे सोलर वापरण्याची परवानगी दिली जाते. अशा प्रकारे सोलर योजनेच्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *