देशात आठवी आर्थिक गणना येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. हे काम वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी राज्यासह जिल्हा, तालुका व महापालिका क्षेत्रावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्याद्वारे दर पाच वर्षांनी आर्थिक गणना करण्यात येते. यावर्षी ही आठवी गणना होणारा असून, तिचे काम एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. जनगणनेसारखेच आर्थिक गणनेचे काम केले जाणार आहे. यामुळे घरोघरी भेट देऊन प्रगणक नागरिकांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती घेण्यात येणार आहेत.
त्याद्वारे उद्योग, व्यवसाय तसेच सेवा क्षेत्र आधीच सहभागी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. ही आर्थिक गणना योग्य पद्धतीने व्हावी, वेळेत व्हावी यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह 18 सदस्य या समितीमध्ये काम करणार आहेत. याच पद्धतीने प्रांताधिकार्याच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावरील नऊजणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
या गणनेसाठी जिल्हास्तरावर दोन, तर तालुकास्तरावर प्रत्येकी दोन मास्टर ट्रेनरची (प्रशिक्षक) नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्याकडून प्रगणकांना गणना कशी करायची, नोंदवहीत कशी माहिती संकलित करायची, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनर नियुक्तीपासून प्रगणन नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष गणना करण्यासाठी श्रेत्र निश्चिती, कालमर्यादा या सर्व बाबी या नियुक्त केलेल्या समितींना कराव्या लागणार आहेत.
घरोघरी होणार गणना-
जनगणनेप्रमाणेच प्रत्येक घरी आर्थिक गणना केली जाणार आहे. सर्व कुटुंबे, खाजगी व सार्वजनिक आस्थापना आदी ज्या ज्या ठिकाणी नागरिक वास्तव्य करत आहेत अथवा उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्रात सहभागी आहेत, अशा सर्व ठिकाणी प्रगणक भेट देणार आहेत.
आर्थिक गणना का महत्त्वाची?-
आर्थिक गणना महत्त्वाच्या आहे, यातून मिळणाऱ्या माहितीद्वारे देश, राज्य, जिल्हा आदीच्या उत्पन्नबाबतचा अंदाज करता येणार आहे. या माहितीचा आधारे सामाजिक व आर्थिक व्यवस्थापन करता येणार आहे. त्या दृष्टीने आर्थिक धोरणे, विविध उपाययोजना केल्या जातात.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.