सिंचन विहीर योजनेतील मोठा बदल!

सिंचन विहीर योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. ही योजना एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे. या योजनेच्या बाबतीतील अतिशय महत्त्वाचा बदल 8 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. याबाबतीतील नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार इंदिरा आवास योजना ही आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. तसेच भोगवटदार वर्ग-2 जमीन करणारे शेतकरी सुद्धा विहिरीच्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर 2022 च्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या ज्या काही एसओपी आहेत यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून योजनेच्या विहीर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड झाली असली तरी त्या लाभार्थ्यास इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. तसेच या लाभार्थ्यांच्या अटी ऐवजी आता नवीन प्राधान्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी व घरकुल योजनेचे लाभार्थी या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून ग्राह्य असणार आहेत.

भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी धारण करणारे-

या योजनेच्या माध्यमातून लाभधारकाची पात्रता असणारे लाभार्थी तसेच जे लाभार्थी पात्रतेचे निकष पूर्ण करणार आहेत असे लाभार्थी, ज्यांच्याकडे जमीन भोगवटादार दोनच्या जमीन धारण करणारे भूधारक हे या विहिर योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन असणारे म्हणजेच एससी, एसटी, ओपन व  ओबीसी प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकरी, या सर्व शेतकऱ्यांकडे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन असली तरी सुद्धा ते विहिरी अनुदान योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *