सन 2025-26 या वर्षासाठी विद्यार्थ्याना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकंतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा व महानगरपालिका शाळांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र शाळांची ऑनलाईन नोंद पूर्ण झालेली आहे. प्रवेश प्रक्रियेची पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही 14.1.2025 ते 27.1.2025 या कालावधीपर्यंत उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या माध्यमातून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागेवर मोफत प्रवेश देण्यात येतो. 25% विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांला दिले जातात. मागील वर्षी या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर पालकांनी न्यायालयात दाद मागितली व प्रक्रिया पूर्ण नव्याने करावी लागली. तसेच मागील वर्षाच्या प्रक्रियेला लागलेला उशीर लक्षात घेता या वर्षी प्रवेश प्रक्रिया ही लवकर सुरू करण्यात आलेली आहे.
वंचित घटक व प्रवर्ग-
इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया करावी. आर्थिक वर्षांमध्ये ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश समावेश होतो. 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावे. शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांना बलूनद्वारे राहत्या घराचे ठिकान निश्चित करण्यासाठी तो बलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येणार आहे, याची नोंद घ्यावी. म्हणून पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करायचे आहे. पालकांनी अर्ज हा दिलेल्या मुदतीमध्ये भरून घ्यावा.
जर प्रवेश प्रक्रियेमध्ये आपणास काही अडचण येत असेल तर आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती दिलेली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून समस्यांचे निवारण करावे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना योग्य माहिती भरणे गरजेचे आहे. (उदा. घरचा पत्ता, जन्मतारीख, उत्पन्नचा दाखला, अपंगाचा दाखला, जात प्रमाणपत्र इत्यादी) ज्या बालकांनी या अगोदर आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे त्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. या अगोदर 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले तर सदर प्रवेश हा रद्द करण्यात येणार आहे. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळून आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी पात्र ठरणार नाही.
इतर सूचना–
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्ध देऊन ऑनलाईन सोडत म्हणजेच लॉटरी काढण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. येईल. त्यानंतर त्या तारखेला ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के राखीव जागाच्यां प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागा एवढीच एका प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देखील देण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या तर पहिल्या प्रतीक्षा यादीत म्हणजे वेटिंग लिस्ट मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत मेसेज पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीच्या आत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत रिक्त राहिलेले जागांसाठी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत मेसेज एनआयसीद्वारे पाठवला जाईल. मग दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेट लेटर काढून विहित मुदतीच्या आत प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने आरटीई प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण ईपर्यंत तिसऱ्या व चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांला एन.आय.सी कडून मेसेज पाठवले जातील.
तसेच लॉटरी जाहीर झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांचे नाव व मोबाईल क्रमांक दिसेल. विद्यार्थ्यांच्या नावापुढे जो दिनांक दिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांस त्या दिवशी प्रवेशासाठी बोलवले आहे, त्यावेळी त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या नावासमोर कागदपत्रे योग्य असल्यास ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकाकडील अलॉटमेट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला आहे, अशी नोंद करावी व ते पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र देखील भरून घ्यावे. काही पालक मूळ गावी किंवा अन्न जागी स्थलांतरित होतात. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
आरटीई प्रवेशासाठी बालकाचे वय-
| प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि.31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय | दि.31 डिसेंबर 2025 रोजीचे किमान वय |
| प्ले ग्रुप/नर्सरी | 1 जुलै 2021-31 डिसेंबर 2022 | 3 वर्षे | 4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
| ज्युनिअर केजी | 1 जुलै 2020-31 डिसेंबर 2021 | 4 वर्षे | 5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
| सिनियर केजी | 1 जुलै 2019-31 डिसेंबर 2020 | 5 वर्षे | 6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
| इयत्ता 1 ली | 1 जुलै 2018-31 डिसेंबर 2019 | 6 वर्षे | 7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- रहिवाशी पुरावा- आधारकार्ड/पासपोर्ट/निवडणूक ओळखपत्र/वीज बिल यापैकी एक
- पाल्याचा जन्माचा दाखला
- पाल्याचे पासपोर्ट साईज रंगीत फोटो
- पालकांचा जातीचा दाखला
- ओपन व ओबीसीसाठी एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला
- आधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

