मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मागील काही दिवसापासून लाभार्थी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केलेली आहे. लाडकी बहिणी योजना ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली गेली होती. तसेच ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर देखील ठरली. राज्यातून पुन्हा महायुतीचे सरकार आले. 26 जानेवारीच्या अगोदरच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात आम्ही करणार आहोत व या महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ देणार आहोत.
या महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. पुढे बोलताना आदित्य तटकरे म्हणाल्या की 26 जानेवारीच्या अगोदर जानेवारी महिन्याचा लाभ मिळावा असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,69090 कोटी रुपयांच्या निधी मिळणार आहे. तसेच अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद देखील आम्ही करणार आहोत. त्यानंतर त्या म्हणाल्या आम्ही फेब्रुवारी महिन्याचे नियोजन देखील करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2 कोटी 46 लाख महिलांना देणार आहोत. काही महिलांबाबत तक्रारी आल्या होत्या. बनावटी केसेस खूप कमी होत्या. त्यांना लाभ देणे बंद करण्यात येणार आहे. यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असे मला वाटत नाही.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.