रज्यातील रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीची मुदत बुधवारी संपलेली आहे. आत्तापर्यंत 32 लाख 28 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी आता गुरुवारपासून 28 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून यंदा रब्बी हंगामातील शंभर टक्के लागवड क्षेत्राची पीक पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याद्वारे चुकलेल्या नोंदणीची दुरुस्ती 28 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. तसेच रब्बी हंगामातील लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी राज्य सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे हे ॲप उपलब्ध करून दिलेले आहे.
रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी शेतकऱ्यांच्या स्तरावरील 1 डिसेंबर पासून बुधवारपर्यंत (दि.15) तारखेपर्यंत करण्यात आली. त्यानुसार 2 कोटी 9 लाख 48 हजार 735 हेक्टर इतके क्षेत्र असून त्यापैकी 30 लाख 43 हजार 366 हेक्टरवरील लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कायम पड असलेले 81 हजार 634 हेक्टर क्षेत्र तर चालू पडलेले 1 लाख 3 हजार 31 हेक्टर क्षेत्रही यात नोंदविण्यात आलेले आहे. त्यानुसार एकूण 32 लाख 28 हजार 32 हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी अर्थात नोंदणी पूर्ण झालेली आहे. सरासरी विचार केला तर लागवड क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 15.41% इतके आहे.
शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी संपल्यानंतर आता सहाय्यक हे उरलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणी करणार आहेत. ही नोंदणी पुढील 45 दिवस होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची नोंदणी केलेली नाही अशा सर्वांनी ही नोंदणी सहाय्यकांमार्फत करावी, असे आवाहन ई-पीक पाह्णी प्रकल्पाच्या संचालकांद्वारे केले जात आहे. ही केलेली पीक पाहणी आता महाभूमी या संकेतस्थळावरील आपली चावडी या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. करण्यात आलेल्या नोंदणीची खात्री करण्यासाठी या पोर्टलचा वापर करावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

