पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमावलीनुसार घरातील या सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यां यादीतून कट करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अगोदर ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
घरात एकाच व्यक्तीला मिळणार लाभ-
यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे. त्यासाठी ई-केवायसीची मदत घेण्यात येणार आहे. पडताळणी नंतर घरात एकाच सदस्याला याचा लाभ मिळेल. त्यामुळे घरातील इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. या योजनेचा लाभ 2019 च्या अगोदर जमीन खरेदी करणाऱ्यांनाच मिळणार आहे.
नवीन नियमावली-
या योजनेच्या माध्यमातून एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा व मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच याचा लाभ देण्यात येणार आहे. इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. या योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. त्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत.
- सर्वात मोठा बदल म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- आयकर भरणारा नोकरदार वर्ग, अल्पभूधारक शेतकरी यांना लाभ देण्यात येणार नाही.
- अर्जाची छाननी ही प्रशासनद्वारे होणार आहे.
- जर एकाच कुटुंबातील अधिक व्यक्ती लाभ घेत असतील तर इतरांचा पत्ता कट होणार आहे.
ई-केवायसी केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही-
जर सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही तर 19वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.
वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत-
या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या माध्यमातून ही रक्कम थेट डीबीटीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्याला 3 हप्त्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. सध्या या योजनेचे एकूण 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तर आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.