आता वारस नोंद ऑनलाईन करता येणार!

नागरिकांना आता ऑनलाईन वारस नोंद करता येणार आहे. नागरिकांना ई-फेरफार प्रणाली प्रणालीला पूरक असलेल्या हक्क प्रणालीचा वापर करून वारस नोंद सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे इत्यादी विविध कामे करता येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी, इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे व इतर महसूल कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागते.

पण अनेकदा एकाच तालुक्यात दोन-तीन गावाचा कार्यभार असल्यामुळे त्यांची व नागरिकांची भेट होत नाही.तलाठी हा आठवड्यातील वार ठरवून येत असतो परंतु तरीसुध्दा बैठकी व इतर व्यापामुळे त्याचा खडा पडतो. अशा वेळ नागरिकांची कामे ही खोळंबतात. तसेच छोट्या-छोट्या कामासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात अशी ओरड होते. यावर आता तंत्रज्ञानाने एक तोडगा शोधून काढलेला आहे.

आता ऑनलाईन वारस नोंद करता येणार-

नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्याअ ई-हक्क प्रणालीचा  वापर करून वारस नोंद, सातबारावरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे इ. विविध कामे करता येणार आहेत. नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता महसूल संदर्भातील कामे घरीबसल्या  ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.

असा करा ऑनलाईन अर्ज-

ई-हक्क प्रणालीच्याद्वारे नागरिकांना वारसा नोंद करता येणार आहे. ई-फेरफार आधारे तलाठ्यांना हे काम करता येणार आहे. त्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी अगोदर साईन- अप, नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर वारसा नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे इतर कामे करता येणार आहेत.

घरबसल्या आठ प्रकारच्या नोंदी ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून करता येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. घरीबसल्या आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. नागरिकांना स्वतः या प्रणालीच्या आधारे अथवा महा-ई-सेवा केंद्रातून देखील अर्ज करता येणार आहे. या प्रणालीच्या वापराने तलाठ्यांचे काम अधिक सोपे होणार आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या कामांमध्ये देखील गतिमानता व पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *