मागेल त्याला सोलर पंप योजनेचा जॉईट सर्व्हे कसा करावा?

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या काही लाभार्थी शेतकऱ्यांना जॉईट सर्व्हे करण्यासाठी मेसेज आलेले आहेत. याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्हेंडरची निवड, पेमेंट केल्याचा मेसेज, त्यानंतर झालेली अर्जाची छाननी व आता त्यानंतरची प्रक्रिया म्हणजेच जॉईंट सर्व्हे. जॉईंट सर्व्हे करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येतात व आपल्या शेताची पाहणी करतात व  त्यानंतर अहवाल सादर केला जातो. त्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी तो शेतकरी पात्र ठरतो. ज्या शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंप योजनेसाठी अर्ज भरलेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे भरले होते.

पैसे भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे. ज्या अर्जामध्ये काही त्रुटी नाही आढळल्या, अशा अर्जांचे काय होणार आहे हे आपण सदर लेखातून जाणून घेऊया. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना वेंडर निवडण्याचा पर्याय हा देण्यात आलेला आहे. वेंडरची निवड केल्यानंतर त्या लाभार्थी शेतकऱ्याचा जॉईट सर्व्हे केला जातो. त्यासाठी कंपनीचा कर्मचारी व महावितरणचा एक कर्मचारी पाहणीसाठी येतात. जॉईंट सर्वे केल्यानंतर अर्जदारास साहित्य देण्यात येते. जॉईंट सर्व्हे कधी होणार आहे याबाबतचा एसएमएस देखील लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येतो.

जॉईट सर्व्हे झालेला आहे की नाही, हे कसे पहावे?-

  • सर्वात अगोदर महावितरणच्या या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तेथे तुमचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे व शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • पुढील विंडोमध्ये तुमच्या अर्जाची सद्यास्थिती दाखवण्यात येईल.
  • तुम्ही जर पुरवठादार किंवा विंडोची निवड केलेली असेल तरच ते दाखवले जाईल.
  • आता काही जिल्ह्यांमध्ये कंपनी निवडल्यानंतर जॉईट सर्व्हे सबमिट केले जात आहेत.
  • त्यामुळे राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा लवकरात लवकर जॉईट सर्व्हे होण्याची शक्यता आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *